निजामी सत्ता झुगारणारी गावे
निजामी सत्ता झुगारणारीगावे
भारतीय स्वातंत्र्य लढयात ज्याप्रमाणे साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले.त्याप्रमाणेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात अनेक गावे निजामी सत्ता झुगारून स्वातंत्र्य झाली. हैदराबाद स्टेट कॉंग्रेसच्या आदेशाप्रमाणे कार्यक्रम आखला गेला व ज्याआठ खेडयांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले.ही खेडी औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर तालुका व अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील पण निजामी हद्दीतील होती.ती खेडी पुढीलप्रमाणे १)गोवर्धन २) सराळा ३)महांकाळ - वाडगाव४)भामाठाण ५)भालगाव ६)चांदेगाव ७)डाकपिंपळगाव ८)नागमठाण
उस्मानाबाद जिल्हयातील मुक्तापूर स्वराज्य
उस्मानाबाद व सोलापूर या दोन जिल्हयाच्या मानेगाव ,जांब गाव दरम्यान निजामी संस्थानातील ६५ गावे होती.१५ ऑगस्ट १९४८ हा स्वातंत्र्यदिन या टापूत राष्ट्रध्वज उभारून साजरा केला गेला.६५ गावांचा एक तालुका घोषित करून याचे नाव ‘मुक्तापूर स्वराज्य’असे ठेवण्यात आले व हा भाग पोलीस कारवाईपर्यंत स्वातंत्र्य सैनिकांच्याच ताब्यात होता.
याशिवाय परतीयाला ९ , इटगी १३,रायचूर १५,गुलबर्गा १७, वरंगल १२, परभणी१००, नांदेड २४, औरंगाबाद १९ आणि उस्मानाबाद ५५ अशी एकूण २७४ गावे निजामी जोखडातून मुक्त करण्यात आली.

Post a Comment