पावसात राजगड - (अवर्णनीय आणि अविस्मरणीय )
पावसात राजगड -
(अवर्णनीय आणि अविस्मरणीय )
(१ सप्टेंबर २०१९ ला केलेल्या राजगडाच्या पावसातील
ट्रेकचा धावता आढावा..)
चौथीला असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास
पहिल्यांदा ऐकला.शिवनेरी, राजगड ही किल्ले पाहण्याची कल्पना त्यावेळी काही
आली नसावी. उदगीरला असताना विवेक नागुरे या प्रिय मित्राचे घर चौबाऱ्या जवळ
असल्यामुळे तिकडे गेलो की किल्ल्यातच फिरायला जायचो ...आठवड्यातून किमान एक वेळा तरी ...पण


इ.स. १६४५ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा ताब्यात घेतला .... तिथे बावीस
हंडे सोन्याच्या मोहरा आढळल्या ... त्यातून मुरूंबदेवाच्या डोंगरावर अजोड , अजिंक्य असा राजगड बांधवून घेतला ..४५७४ फूट उंचावर
स्वराज्याची पहिली राजधानी उभी राहिली ...१६४७ ते १६७२ अशी पंचवीस वर्षे छत्रपती
शिवरायांचे वास्तव या गडावर होते ...
पद्मावती माचीवर सदर, राजवाड्याचे अवशेष बघत
पद्मावती मंदिरात विसावलो येथे कोल्हापूरचे अभिषेक व ओंकार भेटले ... मग मस्त
कंपनी जमली , सईबाईसाहेबांची समाधी , पाण्याचे टाके, रामेश्वर मंदिर, पद्मावती तलाव बघत
बालेकिल्ल्याच्या दिशेने चालते झालो ... अवघ्या जगात राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखा उत्कृष्ट
बालेकिल्ला अन्य कोणत्याही किल्ल्याला नाही असे वाचले होते त्यामुळे बालेकिल्ला पाहिल्याशिवाय
समाधान मिळणार नव्हत. एव्हाना पावसाची रिपरिप वाढली होती ...
रेनकोट असूनही चिंब भिजलो पण आता माघार नाही, स्वतःलाच बजावलं
....राजगडाचा विस्तार मोठा आहे ... पद्मावती माची, . सुवेळा माची, संजीवनी माची
आणि बालेकिल्ला... एका दिवसात पूर्ण किल्ला पाहणं अवघड आहे ... म्हणून
अगोदर बालेकिल्ला ... जोधपुर वाला राकेश खूप थकला होता
त्यामुळे आम्ही त्यास जास्त आग्रह केला नाही.मी, अभिषेक व ओंकार बालेकिल्ल्याकडे
निघालो. बालेकिल्ल्याचे सामर्थ्य त्याच्या दुर्गमपणात आहे. प्रचंड दमछाक करणारा आणि चढाईला कठिण ... काही ठिकाणी तर केवळ हातावर भार देऊन शरीर उचलावे लागतं.पण एकमेकांना आधार देत बालेकिल्ल्यावर पोहाचलो...
महादरवाज्यात
पोहचल्यानंतर मनाला जो आनंद झाला त्याचे वर्णन काय करावे ... येथेही सदर , राजवाडा व इतर बांधकामाचे अवशेष आढळतात ..... मागच्या बाजूला अर्धचंद्राकृती चंद्रतळे आहे.येथेच सोबत आणलेलं जेवण केलो ... व परतीला लागलो ... पाऊस काही थांबायला
तयार नव्हता आणि आम्हीही ... थोडा वेळ संजीवनी माचीवर भटकलो. पावसाळ्यात गडदर्शन करण तसं पाहिले तर फार काळजीपूर्वक
करावं लागते.पण गडभर पसरलेली हिरवाई आणि त्यात उगवलेली विविध रानफुलं पाहायची
असतील तर पावसाळ्याला पर्याय नाही ......
...
एव्हाना चार वाजले होते .. आता
परतीचा प्रवास सुरू केला ... ते दोघे गुंजवणे मार्गे आले होते त्यामुळे एकटयाच
प्रवास परत सुरू झाला .. पावसाची संततधार , उंचावून
कोसळणारे धबधबे , प्रचंड ढग, मध्येच
पक्षांची किलबिलाट सगळ काही स्वप्नवत , परतताना वेग
वाढवला त्यामुळे तासभरात पायथ्याला पोहचलो .... पाच वाजता
पुण्याच्या दिशेने निघालो ... भाताची हिरवीगार शेतं, तुडुंब
वाहणारं पाणी, .... शरीर थकलं पण मन ताजंतवानं
झालं ... म्हणूनच अवर्णनीय आणि अविस्मरणीय राजगड ...
·
Like, share
and subscribe our YouTube Channel –Bhausaheb Umate
·
Download our
App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------
Post a Comment