आमची भूमिका


भारतीय स्वातंत्र्याची परिपूर्ती करणारा लढा म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्राम.मात्र या  इतिहासाची नोंद फारसी घेतली गेली नाही.अनंत भालेराव, नरेन्द्र चपळगावकर व इतर अनेकांनी या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने लेखन केले आहे. मात्र नवीन पिढी या इतिहासापासून दूर आहे. हैदराबादच्या इतिहासासंबंधी संकेतस्थळावर मराठीतून फारसी माहिती उपलब्ध नव्हती. नवीन पिढीला ज्या माध्यमातून माहिती मिळवणे आवडते त्या माध्यमातून ती उपलब्ध व्हावी असा माझा प्रयत्न आहे. या माहितीच्या वाचनानंतर वाचक मूळ ग्रंथांचा अभ्यास करतील अशी माझी अपेक्षा आहे.

हैदराबाद मुक्तीसंग्राम हिंदू प्रजा व मुस्लिम राजा यांच्यातील संघर्ष नव्हता तर हुकुमशाही विरुद्ध जनतेने लोकशाहीसाठी दिलेला लढा होता. रझाकार ही मुस्लिमांची संघटना असली तरी बहुतांश मुस्लीम लोक या संघटनेपासून दूर होते. सय्यद सिराजुल हसन तिरमिजी, शोएब उल्ला खान, फरीद मिर्झा या सारखे राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले मुस्लिम लोकांचे कार्य हा लढा हुकुमशाही विरुद्ध लोकशाही मधील लढा होता हे समजून घेण्यास उपयुक्त आहे.

हैदराबाद मुक्तीसंग्राम हा लोकलढा होता, हजारोंच्या संख्येने सामान्य जनता या मुक्तिसंग्रामात सामील झाली होती. या लढ्याच्या दैदिप्यमान पर्वाची नवीन पिढीला ओळख व्हावी. ज्यांनी या लढयात आपले सर्वस्व समर्पित करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे या भावनेने मी या विषयावर कार्य करीत आहे.

अर्थात माझ्याया कार्यात अभ्यासक, प्राध्यापक व इतिहास प्रेमी मंडळींनी लेखन, व्याख्यानांचे आयोजन वा इतर बाबतीत सहकार्य केल्यास निश्चितच एक चांगले कार्य उभे राहू शकते व हा प्रकल्प सिद्धीस जाऊ शकतो. ज्यांना या प्रकल्पात मला मदत करणे शक्य आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा, आपल्या सूचनांचे ही स्वागत आहे.

संपर्कासाठी मो.क्र.
७५८८८७५६९९.

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.