ऑपरेशन पोलोऑपरेशन पोलो

(हैदराबादवरील पोलीस कारवाई )

      भारत सरकारने निजामाशी जुळवून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करूनही स्वत:निजाम व इत्तेहादुल मुस्लिमीनने सर्व प्रयत्न अयशस्वी ठरवले.भारत सरकारच्या विरोधात कट कारस्थान रचत राहिले. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू मद्रास येथील जाहीर सभेत बोलताना म्हणाले होते की,“जरुरत पडेल तेव्हा आम्ही हैदराबाद मध्ये लष्करी कारवाई करू”.दिवसेनदिवस हैदराबाद मधील परिस्थिती गंभीर होत होती.

पोलीस कारवाईच्या आधी हिंदी लष्कराचे तळ सरहद्दीला लागून स्थापन झाले होते.निजामी हद्दीतून हैदराबादचे लष्कर व रझाकार हिंदी हद्दीत घुसून हल्ले व लुटमार करीत होते.त्यांचा बंदोबस्त व आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी हिंदी लष्कराने ‘ऑपरेशन कबड्डी’ ही सांकेतिक कारवाई सुरु केली.यामध्ये जेथून आपल्या हद्दीत हल्ले होतात.तिथपर्यंत जाऊन आपल्या लष्कराने मुळावर अघात करून परतावे असे अभिप्रेत होते.

जनरल चौधरी याविषयी लिहतात की, “As border protection meant splitting up into small parties and getting ready to play tag across the frontier if necessary,the whole operation was given the code name kabbadi by the division.” हैदराबाद ने लष्करी तयारी तर केली होती.सिडने कॉटन काढून बरीचशस्त्रे व दारुगोळा हस्तगत केला होता.स्वतः जनरल चौधरी यांनी हैदराबाद चे लष्कर किती होते व सिडने कॉटन ने काय काय पुरविले याची यादीच दिली आहे.

“hydrabad states armed strength appeared to be.”

Regular Army 22000

Irregular troops 10000

Armed Arabs, Paiga Forces 10000

Armed police and customs foces ete.

Razakars 200000

“Arms and ammunition brought by Sydney Cotton”

Anti tank mines 1000

Mor 2 inches 8

Mor 3 inches 10

Bombs mor 2 in 2500

50 Browing ammunition 5000

Shells 28 (pounder high explosive ) 500

AA (anti aircraff gum oerlikon 2

ATK (anti tank )guns 6 pr 6

TSMG.S. 1000

TSMG amn 5,00,000

303 Rifles 10000

303amn 500000

Baretta SMCS 3000

Baretta amn 1001000

पोलीस कारवाई करण्याचे ठरले तेव्हा त्याला ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव देण्यात आले.हैदराबाद मधील कारवाई ही लष्कराने केलेली कृती होती .तिचे मुख्य संचालक लेफ्टनंट जनरल महाराज राजेंद्र सिंह जी हे होते .त्यांच्या मदतीला पुढील लष्करी अधिकारी होते.

१) मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी हे सोलापूरहून प्रवेश करणाऱ्या सशस्त्र दलाचे कमांडर होते.

२) मेजर जनरल डी.एस.ब्रार हे सोलापूरच्या उत्तरेला मुंबई विभागातील दलाचे कमांडर होते.

३) मेजर जनरल ए.ए.सुंद्रा हे मद्रास समितीचे कमांडर होते.

४) ब्रिगेडिअर शिवदत्त सिंग हे मध्यप्रांत व वऱ्हाड कडचे कमांडर होते.तर

५) एयर व्हाईस मार्शल मुखर्जी हे संपूर्ण हवाई हालचालीचे व कृतीचे नियंत्रक होते.

१३सप्टेंबरला पहाटे चार वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली.सकाळी नऊ पर्यंत लष्कर नळदुर्गपर्यंत आले.नळदुर्गचा पूल उडवून देण्याचा हिंदी लष्कराचा बेत फसला होता.पुढे फारसा प्रतिकार झाला नाही. बिदर ताब्यात आले व विमानतळ ही .जहिराबादला अचानक प्रतिकार झाला. शत्रूच्या अचानक गोळीबारामुळे होशनाकसिंग हा जवान शहीद झाला.पुढे मात्र भारतीय लष्कराने जोरदार मुसंडी मारली.१७ सप्टेंबरला निजाम शरण आला.स्वतः निजामानेच सायंकाळी ५ वाजता हैदराबाद रेडीओ केंद्रावरून भाषण करून आपण हे युद्ध थांबवत असल्याचे सांगितले.त्या वेळीच जनरल अल इद्रूस एका रक्षकासह हिंदी लष्कराकडे आले व हैदराबाद शरण येत असल्याचे सांगितले.जनरलजे. एन.चौधरी यांनी ही शरणागती स्वीकारली व हिंदी लष्कराने हैदराबादचा ताबा घेतला.अशाप्रकारे हैदराबाद संस्थानात मुक्तीची पहाट उगवली.

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.