आसफिया घराण्याचा इतिहास



                                   आसफिया घराण्याचा इतिहास

आसफिया घराण्याचा संस्थापक म्हणून पहिला निजाम ऊल मुल्क  यांना ओळखले जाते. समरकंद बुखाराहून आलेल्या ख्वाजा अबिद अली यांचा हा मुलगा.यांचे मूळ नाव मीर कमरुद्दीन असे होते.इ.स.१७२४ मध्ये यांनी आसफिया घराण्याची सत्ता घोषित केली.मात्र मोगल सम्राट फरुखसैरने दिलेला निजामुल्मुक (अर्थ – देशाची व्यवस्था लावणारा)हा किताब मात्र कायम ठेवला व ही परंपरा त्यांच्या उत्तराधिकारी पण पाळत राहिले. म्हणूनच या घराण्याचे मूळ नाव आसफिया असे असताना ही निजाम राजवट या नावानेच हे घराणे सर्व सामान्यांना परिचित आहे.

आसफिया घराण्यातील राजे पुढीलप्रमाणे

१)पहिला निजामुल्मुक असिफजाह (इ.स.१७२४-१७४८)

२)दुसरा मीर निजामअली (इ.स.१७६२ ते१८०३)

३)तिसरा निजामसिकंदरजहा (इ.स.१८०३ ते १८२९)

४)चौथा निजाम नासिरूदौला (इ.स.१८२९ ते १८५७)

५)पाचवा निजाम अफजलुदौला (इ.स.१८५७ ते १८६९)

६)सहावा निजाम मीर महबूबअली (इ.स.१८६९ ते १९११)

७)सातवा निजाम मीर उस्मानअली (इ.स.१९११ ते १९४८)

(इ.स.१७४८ ला पहिला  
निजाम ऊल मुल्क असिफजाह यांच्या मृत्युनंतर इ.स.१७६२ पर्यंत त्याच्या चार मुलांत गादीसाठी भांडणे होत राहिली शेवटी इ.स.१७६२ ला निजाम अली गादीवर आला व आपणच पहिला निजामुल्मुक असिफजाह यांच्या नंतरचे दुसरे निजाम असल्याचे जाहीर केले.त्यामुळे या काळातील निजामाची गणना केली जात नाही.)


No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.