मराठवाडयातील हुतात्मे
मराठवाडयातील हुतात्मे
१) वेदप्रकाश ऊर्फ दासप्पा शिवबसप्पा हरके ,रा.गुंजोटी ,गुंजोटीच्या दंग्यात.
२)शंकर शामराव जाधव ,रा.उस्मानाबाद ,रौळगावी टेहळणी करताना.
३)राम सुबराव सूर्यवंशी, देवळालीच्या हल्ल्यात.
४)कृष्णा लक्ष्मण क्षीरसागर, देवळालीच्या हल्ल्यात.
५) श्रीधर वर्तक ,राहणार हैदराबाद ,अपसिंगा रझाकार केंद्र
६)धर्मवीर श्यामलाल ,रा.भालकी,बिदर जेलमध्ये विषप्रयोग.
७)भीमराव रा.हिपळे ता.उदगीर,उदगीरच्या दंगलीत
८)भीमरावची चुलती .नावाची नोंद नाही, उदगीरच्या दंगलीत
९)माणिकराव रा.हिपळे ता.उदगीर,उदगीरच्या दंगलीत
१०)श्रीनिवास धोंडोपंत कुलकर्णी मुगळीकर ,
उमरगा ,उमरग्यानजीक
रझाकाराकडून हत्या
११)गोपाळराव अप्पाराव कुलकर्णी
उमरगा ,उमरग्यानजीक रझाकाराकडून हत्या
१२)कंठप्पा गुरदप्पा
उमरगा ,उमरग्यानजीक रझाकाराकडून हत्या
बीड जिल्हा
१)देवराव पाटीलबुवा उगलमुगले रा.पिंपळनेर (जायभाय)
वेलनुरी रझाकार केंद्रावरच्या हल्ल्यात.
२)देवराव अडसूल रा. बेंडसुरा ता.पाटोदा
३)आसराजी बाजीराव खोड
रा. करंजगण ता.पाटोदा
४)लक्ष्मण मारुती कुंभार रा वाघीरा ता.पाटोदा
५)बाबूराव धोंडीबा राख रा.येरळा ता.पाटोदा
६)काशीनाथ नारायण गव्हाणे रा.टाकळगव्हाण ता.गेवराई
७)काशीनाथ किशनराव सोनार रा.धारूर ता.केज
८)नाथू गनुजी गाडेकर
रा.शिरूर ता.पाटोदा
९)रामभाऊ लक्ष्मण कळसकर रा.खोकर मोहता ता.पाटोदा
१०)बळीराम लक्ष्मण सरवदे रा.वाल्ही ता.पाटोदा
११)खाशाबा भागूजी निमसे रा.केंद्र हातवळणे ता.गेवराई
१२)हरिभाऊ दगडू जगताप रा.केंद्र हातवळणे ता.गेवराई
१३)नामदेव ग्यानदेव सानप रा.सावरगाव घाट ता.पाटोदा
१४)विश्वनाथ गोपाळराव कांबळे रा.नांदूर घाट ता.केज
१५)गुणाजी मनाजी वणवे रा.रोहीलवाडी ता.पाटोदा
१६)वामन राजाराम काशीर रा.रोहीलवाडी ता.पाटोदा
१७)यादव पाटील बुवा सानप रा.वडसुरी ता.पाटोदा
१८)लिंबाजी बाप्पाजी सानप रा.वडसुरी ता.पाटोदा
१९)दगडूराम नंदलाल संचेती रा.लिंबा गणेश ता.बीड
२०)बाबूराव धोंडीराम आदेकवाडी रा.नायगाव ता.पाटोदा
२१)उमाजी लिंबाजी रा.मनूर ता.माजलगाव
नांदेड जिल्हा
१)गोविंदराव विनायकराव पानसरे रा.धर्माबाद अर्जापूर ता.बिलोली या गावच्या नजीक
रझाकारांच्या हल्ल्यात ठार.दि.२१ऑक्टोबर १९४६
२)बाळाबाई रा.कोंडलवाडी,अर्जापूर गोळीबारात ठार.(६ जाने.१९४०)
३)संताजी रख्माजी,राहणार कांगठी, अर्जापूर गोळीबारात ठार.(६ जाने.१९४०)
४)शिवा (वय १२ वर्ष )रा.येळी , अर्जापूर गोळीबारात ठार.(६ जाने.१९४०)
५)जानकीलाल मोहनलाल राठी रा.हदगाव इस्लापूर पोलीस ठाण्यावरच्या हल्ल्यात ठार.
६)लाखसिंग मेघासिंग लमाणी रा.चितगिरी तांडा इस्लापूर हल्ल्यांत ठार.
७)तुकाराम किशनराव कंजारकर,रा.कंजारा ता.हदगाव,
इस्लापूर हल्ल्यांत ठार.
८)जयवंतराव वायपणेकर पाटील रा.वायपणा ता.हदगाव, इस्लापूर हल्ल्यांत ठार.
९)किशनसिंग छेडासिंग रा.नांदेड ,नांदेडच्या दंग्यात ठार.
१०)दत्तात्रय देविदास उत्तरवार रा.उमरी. उमरीच्या जातीय दंगलीत ठार.(१९४५)
११)रघुनाथ हंबरडे,रा.टेकळी ता.कंधार ,टेकळी जंगल सत्याग्रहावर झालेल्या
गोळीबारात ठार.(१९४७)
१२)मोतीराम लक्ष्मण, टेकळी गोळीबारात ठार.
१३)भिकाजी तुळशीराम, टेकळी गोळीबारात ठार.
१४)धोंडीबा काळे,रा.वडगाव, टेकळी गोळीबारात ठार.
१५)गणपत उमाजी अमृते,डोर्ली ता.ऑगस्ट १९४७ च्या गोळीबारात ठार.
१६)ईश्वर वामन शिंदे, डोर्ली ता.ऑगस्ट १९४७ च्या गोळीबारात ठार.
१७)संभाजी लक्ष्मण कांबळे, डोर्ली ता.ऑगस्ट १९४७ च्या गोळीबारात ठार.
१८)हरि तुकाराम रा.इस्लापूर, डोर्ली ता.ऑगस्ट १९४७ च्या गोळीबारात ठार.
१९)हिरामण चांदबा पवार, रा.निवघा ,रझाकारांनी निवघा येथे ठार केले.
२०)दाजीबा संभाजी पवार, रा.निवघा ,रझाकारांनी निवघा येथे ठार केले.
२१)नरबा गंगाराम पवार, रा.निवघा ,रझाकारांनी निवघा येथे ठार केले.
२२)मोतीराम गोपाळ पवार रा.निवघा ,रझाकारांनी निवघा येथे ठार केले.
२३)महादेव बापुजी पवार, रा.निवघा ,रझाकारांनी निवघा येथे ठार केले.
२४)संभाजी पुरभा येडके,कांबळजला येथे रझाकारांनी ठार केले.
२५)मारुती संभाजी पवार, कांबळजला येथे रझाकारांनी ठार केले.
२६)भीमराव निवघेकर, कांबळजला येथे रझाकारांनी ठार केले.
२७)पुंजाजी भवानजी खुपसे,रा.निवघ्याला रझाकारांनी ठार केले.
२८)गणोजी राघोजी खुपसे, रा.निवघ्याला रझाकारांनी ठार केले.
२९)शिवराम लक्ष्मण लोहार,रा.हणेगाव ता.देगलूर,सुभाष सेना व
रझाकार यांच्यात संघर्ष होऊन त्यात ठार.
३०)निळकंठप्पा संगमबसय्या मैसुरे, सुभाष सेना व रझाकार
यांच्यात संघर्ष होऊन त्यात ठार.
३१)शरणप्पा महदप्पा पटने, सुभाष सेना व रझाकार यांच्यात
संघर्ष होऊन त्यात ठार.
३२)पेंटाजी नागन्ना,रा.देगलूर,रझाकाराकडून ठार.
३३)चंदू केवळा नाईक रा.चित्रगिरी तांडा,रझाकारांनी ठार
केले.
३४)लालसिंग लमाण,रा.संदगी तांडा,रझाकारांनी ठार केले.
३५)लखमा नाईक,रामेश्वर तांडा,रझाकारांनी ठार केले.
३६)आनंदा मंचा, रामेश्वर तांडा,रझाकारांनी ठार केले.
३७)संभाजीराव अप्पा नखाते,रा.पाटनूर,रझाकारांकडून ठार.
परभणी
जिल्हा
१)बहिर्जी हनुमंतराव शिंदे रा.वापटी ,ता.वसमत ,आजेगावच्या
रझाकार केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ठार.(१९ जुलै १९४८)
२)राजेश्वर गोपाळराव वाकोडीकर रा.वाकोडी ता.कळमनुरी दि.२४
जानेवारी १९४८ ला रझाकारांनी केलेल्या हल्ल्यात ठार.
३)अण्णासाहेब ऊर्फ गंगाधर बळवंत कुळकर्णी,रा.गुंडा ता.वसमत ,रझाकारांच्या
हल्ल्यात ठार.
४)गुणाजी गुंडाजी भालेराव
५)नागोजी गुंडाजी चव्हाण
६)चंपती संतोबा चव्हाण
७)साहेबराव विठ्ठलराव चव्हाण
८)सौ.मालनबाई दत्तोपंत जोशी
९)कु.शकुंतला दत्तोपंत जोशी
(वरील सर्व गुंडा गावावर रझाकारांनी केलेल्या हल्ल्यात ठार
झाले.)
१०)मोहनलाल मुलचंद मुरक्या
रा.पांगरा गोसावी ता.वसमत
११)शंकरलाल मुलचंद मुरक्या
रा.पांगरा गोसावी ता.वसमत
१२)बाबाराव भुजंगराव शिंदे
रा.पांगरा गोसावी ता.वसमत
१३)पांडुजी खंडूजी पाचपुते
रा.पांगरा गोसावी ता.वसमत
रझाकारांच्या हल्ल्यात ठार
१४)विनायक सीताराम कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला व त्यांना
ठार केले.
१५)यमाजी ,घोडा गावावर रझाकारांनी हल्ला केला व त्यात ठार
केले.
रामेश्वर तांडा(ता.कळमनुरी ) या गावावर रझाकारांनी हल्ला
केला त्यात पुढील चौघे मारले गेले.
१६)आनंदा मंन्छा राठोड,
रा. रामेश्वर तांडा(ता.कळमनुरी )
१७) लक्ष्मण धनसिंग राठोड, रामेश्वर तांडा(ता.कळमनुरी )
१८)बुधाजी अमृता , रामेश्वर तांडा(ता.कळमनुरी )
१९)नारायण सखाराम पांडे शेवाळा
हेरगिरी करून स्टेट कॉंग्रेसच्या सीमावर्ती कॅम्पसना माहिती
पुरवली म्हणून ठार करण्यात आलेले:
२०) गोविंद विठोबा सुतार ,वाकोडी
२१)जीवनाजी द्वारकोजी साखरे ,वाकोडी
२२)नारायण जयराम,महारी
२३)विश्या विठ्या महारी
येळेगावहून परत येत असताना वारकरी संप्रदायाच्या पुढील
लोकांना रझाकारांनी गोळ्या घालून ठार केले.
२४) नाना सखाराम पाटील ,शिवणी
२५)दत्तराव मारोतराव जाधव ,शिवणी
२६)उमाजी विठोबा वानखेडे ,शिवणी
२७)अच्युत त्र्यंबक राव कुलकर्णी ,नाथ्रेकर यांना तुरुंगात (हरसूल
)क्षयाची बाधा झाली .त्यांच्या प्रकृतीची अक्षम्य हेळसांड झाली व त्यातच त्यांचा देहान्त
झाला.
औंढा नागनाथ येथील शिवरात्रीच्या यात्रेत करण्यात आलेल्या
बॉम्ब स्फोटात पुढील तिघे ठार झाले.
२८)रामभाऊ शंकरराव पाठक रा.औंढा नागनाथ
२९)गणपत एकनाथ ऋषी रा.औंढा नागनाथ
३०) रंगनाथ संतुकराव सुखाडकर रा.औंढा नागनाथ
औरंगाबाद जिल्हा
१)भाऊराव तात्याराव कानडे
रा.चांगतपुरी,ता.पैठण यांना दि.२६ जून १९४८ रोजी रझाकारांनी घारी महमंदपूरनजीक
घेरले व हेरगिरी करतात म्हणून त्यांची खांडोळी केली.
२)सांडू सखाराम न्हावी रा.बोरगाव घाट ता.सिल्लोड ,नांदखेडयावर निजामी पोलीस व लष्कर
यांनी हल्ला केला तेव्हा त्यांच्या प्रतिकारात मारला गेला.लष्कराने त्यांचे शिर
कापून बोरगावच्या वेशीवर टांगले.
३)विश्वनाथ कालिदास राजहंस ,जरंडी पोलीस ठाण्यावरच्या हल्ल्यात ठार.
४)काशीनाथ म्हातारजी म्हस्के
रा.हातमाळी लाडसावंगीच्या गोळीबारात ठार.
५)वसंत सदाशिव राक्षसभुवनकर,रा.बीड ,भामाठाण करोडगिरी नाक्यावर करण्यात
आलेल्या हल्ल्यात ठार.
६)जनार्धन मामा नागापूरकर,रा.नागापूर ,डोणगावच्या हल्ल्यात ठार.
गोवर्धन सराळा या बेटाला लागून असलेल्या आठ गावात समाजवादी गणराज्य कायम
करण्यात आले होते.त्यावर निजामी पोलीस व लष्कर यांनी केलेल्या हल्ल्यात पुढील चौघे
हुतात्मा झाले.
७)जगन्नाथ सखाराम भालेराव
८)रामचंद्र महादू धंदेकर रा.नांदेड
९) गंगाधर कवठेकर रा.नांदेड
१०)जगजीवन (गुजराथ )
(संदर्भ -
१) स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश महाराष्ट्र राज्य,मराठवाडा
विभाग
डॉ.भ.ग.कुंटे
,कार्यकारी संपादक व सचिव ,दर्शनिका विभाग ,महाराष्ट्र शासन ,मुंबई
२)हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा – लेखक- अनंत
भालेराव
३)हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम – वसंत पोतदार
Post a Comment