दहावी स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख 7 संविधानाची वाटचाल ( स्वाध्याय )


इयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
स्वयंअध्ययन अभ्यासमाला  लेख 7 
प्रकरण १  .
संविधानाची वाटचाल ( स्वाध्याय )    

                                                                          
   भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                  ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
                                                                                       इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
                                                                                         बालभारती, पुणे४११००४
                                                                                                www.bhausahebumate.com
                                                                                       
           विद्यार्थी मित्रांनो,मागील लेखात आपण संविधानाची वाटचाल या राज्यशास्त्रातील पहिल्या   प्रकरणाचा अभ्यास  केला होता.
 आज आपण या प्रकरणावरील स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत.मित्रांनो चांगले गुण मिळवण्यासाठी राज्यशास्त्र हा विषय खूप उपयुक्त आहे. त्यामुळे या  प्रकरणाचा अभ्यास करताना परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही तयारी करणे आवशयक वाटते.
सूचना-   या प्रकरणाला विक्ल्पासह एकूण ५  एकूण आहेत.
मार्च २०२० च्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या समोर तसा उल्लेख केला आहे.


प्रश्न १.   दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
  
१.महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थामध्ये महिलांसाठी ...................जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
उत्तर - महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थामध्ये महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
२. पुढीलपैकी ..............या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.
उत्तर - पुढीलपैकी हुंडाप्रतिबंधक कायदा या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.
३.लोकशाहीचा गाभा म्हणजे ...............होय. ( मार्च २०२०)   
उत्तर- लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय.    
 
प्रश्न २ पुढील विधाने चूक की बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
१ भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.( मार्च २०२० )
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
कारण १.भारतात मुळातच मताधिकाराची व्याप्ती व्यापक होती.भारतात प्रत्येक स्त्री – पुरुषाला २१ वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता.
२.मतदानाचा अधिकार आणखी व्यापक करून २१ वर्ष वयाची अट नंतर १८ वर्ष अशी करण्यात आली.यामुळे भारतात युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाला.
३.अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.
२ माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे .
कारण १ लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, सुदृढ होत जाते.
२. ‘पारदर्शकता आणि उत्तरदायित्व’ ही सुशासनाची दोन वैशिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला.
३. यामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.
३.संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत प्रमाणे असते.
उत्तर: हे विधान बरोबर आहे.
कारण १ भारतीय संविधान हे लिखित असले तरी बंदिस्त नसून  प्रवाही आहे.
२.आवश्यकतेनुसार संविधानात बदल करता येतात.संविधानात बदल करण्याचा  अधिकार संसदेला आहे.पण संविधानात बदल करताना संसदेला संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही.
३.अर्थात संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे  आहे. 
प्रश्न ३ टिपा लिहा.
१.अल्पसंख्यांकविषयक तरतुदी :
१ भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकाचे   संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत.
२ भारतीय संविधानाने जात,धर्म,वंश, भाषा व प्रदेश इ.घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे अल्पसंख्यांकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे.
२ राखीव जागाविषयक धोरण:
१.भारतात शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
२.अनुसूचित जाती व जमातीसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यामध्ये काही जागा  राखीव ठेवल्या जातात.त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे.
३ माहितीचा अधिकार: ( मार्च २०२० )
१.लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, सुदृढ होत जाते. २.‘पारदर्शकता आणि उत्तरदायित्व’ ही सुशासनाची दोन वैशिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. यामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.
प्रश्न ४  पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१.मतदाराचे वय २१ वर्षावरून १८ वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?
उत्तर : मतदाराचे वय २१ वर्षावरून १८ वर्ष केल्यामुळे भारतातील युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाले. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाऊ लागली.हा बदल केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक ही आहे.अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठींब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले.त्यामुळे भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही बदलले आहे.
२.समाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
उत्तर : सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे.जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे.सर्वाना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे.सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून प्रयत्न करावे लागतात पण  शासनाच्या धोरणांना व  अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते.
३.न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?
उत्तर:स्वातंत्रोत्तर काळात भारतात महिलांमधील निरक्षरता दूर करणे,त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी धोरणे आखली गेली तसेच वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा हे न्यायालयाचे पुढील निर्णय महत्वाचे ठरले या कायद्यांमुळे  महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक करण्यासाठी मदत झाली.
                                      

 सूचना – शिक्षक बांधवानो व  विद्यार्थी मित्रांनो ,  आता भाऊसाहेब उमाटे सरांचे  मार्गदर्शन व्हिडीयोज  Total History By Umate sir या  Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या  स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल. 
·       Like, share and subscribe our YOUTUBE Channel - Total history by Umate sir    

         ·        Our Official website - www.bhausahebumate.com

         ·        Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.