इतिहास स्वयंअध्ययन अभ्यासमाला


इयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
स्वयंअध्ययन अभ्यासमाला  
लेख १
                                                                       
                                                                               भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                  ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
                                                                             इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व 
अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
                                                                                 बालभारती, 
 पुणे४११००४
                                                                                                             www.bhausahebumate.com
 

                                                                                      
              इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत.... विद्यार्थी मित्रांनो, सद्य परिस्थितीत लॉक डाउनमुळे आपण घरातच आहोत. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. घरी बसून शाळा कधी सुरु होतील याचा विचार करण्यापेक्षा आपण अभ्यासाला सुरुवात  करावी असे मला वाटते. माझ्या मते स्वयंअध्ययन हाच या काळातील सर्वात महत्वाचा मंत्र आहे. त्यास्तव या लेखमालेच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाला दिशा देण्याचा माझा प्रयत्न असेल.    
आज आपण सामाजिक शास्त्रांतर्गत येणाऱ्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचा विचार करणार आहोत. उत्तम गुण मिळवून देणारा विषय अशी या विषयाची ओळख आहे. मात्र  आपण अगदी सुरुवातीपासूनच या  विषयाचा गांभीर्याने अभ्यास करणे अपेक्षित आहे. इतिहासाचा अभ्यास करताना स्थळ,  काळ, घटना लक्षात ठेवाव्यात.  केवळ प्रश्न - उत्तरे असा अभ्यास न करता घटनाक्रम समजून  घ्यावा. राज्यशास्त्राचा अभ्यास करताना   संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. या विषयाचा आवाका जरी जास्त असला तरी नियोजनपूर्वक. नियमित अभ्यास केल्यास निश्चितच आपला अभ्यास  आनंददायी होईल आणि उत्तम गुणही प्राप्त होतील. आज आपण सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊ ......
इतिहास राज्यशास्त्र
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

वेळ २ तास                                         गुण ४०

प्र. १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.                         ( गुण )

      
 (ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.                                     ( गुण )                                                       


 प्र.२ . (अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. (कोणत्याही दोन)                                 ( गुण ४  )  
        

(ब) टीपा लिहा.  (कोणत्याहीदोन)                                     ( गुण ४ )

प्र. ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (कोणतेही दोन)                                        ( गुण ४  )

प्र. ४. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.                 ( गुण ४  )

 प्र. ५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)                                   ( गुण ६  )                      
प्र. ६. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.                       ( गुण २  )                              
प्र. ७. पुढील विधाने चूक की बरोबर ते  सकारण स्पष्ट करा. (कोणतेही दोन)                 ( गुण ४  )
                            
प्र. ८ () पुढील संकल्पना स्पष्ट करा. (कोणतीही एक )                                       ( गुण २  )
       
         ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. (कोणतीही एक )                                    ( गुण २  )
         

प्र. ९. पुढील प्रश्नांची थोडक्यात  उत्तरे लिहा. (कोणतेही एक )                               ( गुण २  )
                             

                 


सूचना : विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व राज्यशास्त्र  या विषयाला लेखी परीक्षेला एकूण ४० गुण आहेत.( इतिहास २८ व राज्यशास्त्र १२ ) इतिहासाला २८ गुण असले तरी विकल्पासह   एकूण गुण ४२ होतात व राज्यशास्त्रास १२ गुण असले तरी विकल्पासह  २० गुण होतात.
( विकल्पासह  इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे एकूण गुण ६२ आहेत)
इयत्ता दहावीला आपणास  उपयोजित इतिहासाचा अभ्यास करावयाचा  आहे. पाठयपुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. मात्र गुणविभागणी करताना मात्र ती चार घटकात केली आहे. अगोदर आपण इतिहास या विषयाची  घटक निहाय गुण विभागणी पाहू यात ....

इतिहास
घटकनिहाय गुणविभागणी१)इतिहासाचे चिकित्सक समालोचन (प्रकरण १ व २) गुण ६ ( विकल्पासह गुण ९)

२)उपयोजित इतिहास  (प्रकरण ३) गुण ३ 
( विकल्पासह गुण ५ )

३)विविध घटकांचा इतिहास  (प्रकरण , , , , ८ ) गुण १६ ( विकल्पासह गुण २३) 

४)इतिहास अन्य क्षेत्रे    (प्रकरण ९) गुण ३ 
( विकल्पासह गुण ५)

घटकनिहाय गुणविभागणी
 
राज्यशास्त्र

१)प्रकरण १ (संविधानाची वाटचाल) गुण ३ 
( विकल्पासह गुण ५ )

२)प्रकरण २ व ३ (निवडणूक प्रक्रिया / राजकीय पक्ष ) गुण ५  ( विकल्पासह गुण ८)

३)प्रकरण ४ व ५ (सामाजिक व राजकीय चळवळी / भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने )    गुण ४ ( विकल्पासह गुण ७ )

अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी वरील दोन बाबी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.आता आपण अभ्यासला सुरुवात कशी करावयाची याविषयी बोलू यात
अभ्यास पायऱ्या 

         तुम्ही नववीपर्यंत शिकलेल्या इतिहासापेक्षा प्रस्तुत इतिहास वेगळा आहे. मात्र इतिहास या विषयातील व्यावसायिक संधीचे ज्ञान शालेय पातळीवरच उपलब्ध व्हावे म्हणून आवर्जून हा अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध झाला आहे.मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे उत्तम गुणांबरोबरच या विषयातील व्यावसासिक संधीच्या उपलब्धतेविषयी जाणून घ्याल.पहिल्या दोन प्रकरणात (प्रकरण १.  इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा / प्रकरण २ इतिहासलेखन : भारतीय परंपरा ) इतिहास लेखनाचे शास्त्र कसे विकसित झाले हे सांगितले आहे.आज आपणास  फक्त पहिल्या प्रकरणाचा विचार करावयाचा आहे .पहिल्या प्रकरणात इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा विषद केली असून इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात योगदान देणाऱ्या महत्वाच्या विचारवंतांच्या इतिहास विषयक विचारांचा परिचय करून देण्यात आला आहे.तुम्ही एक ते दोन वेळा लक्षपूर्वक वाचन केल्यास या संकल्पना समजून घेता येतील. त्यानंतर सुरुवातीला संपूर्ण प्रकरणाच्या नोटस काढा ...
नोटस कशा काढाव्यात ?
प्रस्तुत प्रकरणातील संकल्पना समजून घेतानाच त्यातील महत्चाची माहिती नोटस मध्ये येणे अपेक्षित आहे.संपूर्ण प्रकरण जशास तसे उतरून काढणे म्हणजे नोटस नव्हेत. नोटस मध्ये फक्त महत्वाचे मुद्दे , संकल्पनाचा विश्लेषणासह समावेश असावा. या नोट्स तुम्हाला Revision साठी खूप उपयुक्त ठरतील,
त्यानंतर  स्वाध्यायातील प्रश्नाची उत्तरे  पाठ्यपुस्तकातून शोधण्याचा प्रयत्न करा. ही उत्तरे स्वत: शोधा कोणत्याही गाईड वा अन्य साधनांचा वापर करू नका.तुम्हाला उत्तरे शोधताना अजून एक किंवा दोनदा पाठ्यपुस्तक वाचून होईल व एव्हाना बहुतांश संकल्पना ज्ञात झाल्या असतील. ज्या वेळा आपण स्वतः  वाचन करून एखादा भाग समजून घेतो तेव्हा त्यातील आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही आणि तो भाग विसरण्याची शक्यता कमी होते ( अर्थात त्यास्तव उजळणी आवश्यक असतेच )  शेवटी स्वाध्यायातील प्रश्न व त्याची उत्तरे वहीत लिहून काढा. स्वाध्यायातील प्रश्नांव्यतिरिक्त प्रकरणातील इतर प्रश्नांची तयारी कशी करावी याबाबत आपण पुढच्या भागात पाहू यात..... तोपर्यंत तुम्ही वेळ वाया न घालवता  पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करा.
(        पुढील लेख दिनांक ६ मे २०२० ( बुधवार ) सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल. यात  आपण   इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती घेऊ यात ......)
          मित्रांनो तुम्हाला लेख प्रसिद्ध झाल्याचे Notification प्राप्त होण्यासाठी आमच्या वेबसाईटला Follow
       करा. 
 सूचना – शिक्षक बांधवानो व  विद्यार्थी मित्रांनो ,  आता भाऊसाहेब उमाटे सरांचे  मार्गदर्शन व्हिडीयोज  Total History By Umate sir या  Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या  स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल. 
·       Like, share and subscribe our YOUTUBE Channel - Total history by Umate sir   
   ·    Follow Us On -       www.bhausahebumate.com

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.